कर्नाटक : हावेरीतील साखर कारखान्यात 3.71 कोटी रुपयांची कथित फसवणूक; 28 जणांसह मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल

हावेरी: कर्नाटकातील हावेरी तालुक्यातील जीएम शुगर्स अँड एनर्जी साखर कारखान्यात 3.71 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी हावेरी ग्रामीण पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या युनिट-1 चे उपमहाव्यवस्थापक माणिकराव अभंगराव गडदे यांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील हरिलाल तांडा येथील उल्लास धानुजी राठोड आणि 28 उसतोड मजुर यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. साखर कारखाना व्यवस्थापनाने 2025-26 हंगामासाठी ऊसतोडणी आणि वाहतूक कामासाठी उसतोड मजुरांशी करार केला होता.

18 मे 2025 रोजी आरोपी कारखान्याच्या कार्यालयात आले होते. त्यांनी वेळेत काम पूर्ण करण्याचे आश्वासन देत करारावर स्वाक्षरी केली आणि त्यानंतर आगाऊ रकमेची मागणी केली.यानंतर विविध बँक खात्यांद्वारे टप्प्याटप्प्याने एकूण 3.71 कोटी रुपये त्यांना अदा करण्यात आले. मात्र, रक्कम मिळाल्यानंतर संबंधित गँगमन आपल्या गावांकडे परत गेले आणि पुन्हा कारखान्यात हजर झाले नाहीत. तेव्हापासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे दिसून येत आहे. आरोपींचे पत्ते आणि उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार पुढील तपास सुरू आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here