कर्नाटक : ऊसदराचा चेंडू केंद्राच्या कोर्टात; सहा हजारांच्या मागणीवर मंत्री जारकीहोळींचे मोठे वक्तव्य

बेळगाव : उसाला प्रतिटन सहा हजार रुपये दर मिळावा, अशी मागणी होत असली तरी त्यासाठी केंद्र सरकारनेच किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवून निर्णय घ्यावा. उसाचा दर निश्चित करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, असे स्पष्ट मत सार्वजनिक बांधकाम तथा बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. खानापूर येथे पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले की, एमएसपीमध्ये वाढ करण्याची मागणी करणारे पत्र शिष्टमंडळामार्फत केंद्र सरकारला देण्यात आले आहे.

ते म्हणाले, दरवर्षी एमएसपी वाढविण्याची मागणी केली जाते; मात्र अद्याप अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. यंदा एमएसपीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांची बैठक झाल्यानंतर केंद्र सरकारने चर्चेसाठी बोलावल्यास आपण त्यात सहभागी होऊ. मात्र, सध्या केंद्र सरकारकडून कोणतेही निमंत्रण आलेले नाही. साखर कारखाने आणि शेतकऱ्यांमध्ये करार झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. त्यासाठी अद्याप पुरेसा वेळ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ChiniMandi WhatsApp Channel

एसआयआर प्रक्रियेबाबत संभ्रम नाही

एसआयआर प्रक्रियेबाबत कोणताही संभ्रम नसल्याचेही पालकमंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे. जाणीवपूर्वक चुकीचे अर्ज दाखल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर सात दिवसांच्या आत नोटीस बजावली जाते. आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

बीएलए-२च्या माध्यमातून अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. एखाद्या पात्र मतदाराचे नाव मतदारयादीतून वगळले गेल्यास त्यावर आक्षेप नोंदविता येतो. बेळगावमध्ये एकाही पात्र मतदाराचे नाव जाणूनबुजून वगळण्यात आलेले नाही. एखाद्या मतदाराचे नाव वगळल्याचे आढळून आल्यास माहिती मिळताच ते पुन्हा समाविष्ट केले जाईल.एसआयआर प्रक्रियेबाबत भाजपकडून विनाकारण संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही जारकीहोळी यांनी केला.दरम्यान, राज्यातील रिक्त मंत्रिपदांबाबत विचारले असता, लवकरात लवकर मंत्रिपदांची भरती केली जाईल, असेही पालकमंत्री जारकीहोळी यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here