कर्नाटक : ‘लैला शुगर्स’च्या व्यवस्थापनाविरोधात भाग्यलक्ष्मी शुगर एम्प्लॉईज युनियनचे आंदोलन

बेळगाव : कुप्पटगिरी (ता. खानापूर) येथील श्री भाग्यलक्ष्मी शुगर एम्प्लॉईज युनियनने लैला शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाविरोधात आंदोलन केले. कामगारांना काम नाकारले जात असल्याचा आरोप करत संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ज्येष्ठ कामगारांना ले-ऑफ देऊन काही दिवसांतच रोजंदारी व कॅज्युअल कामगारांना कामावर घेतले गेले. मात्र, वरिष्ठ कामगारांना जाणीवपूर्वक कामापासून दूर ठेवण्यात आले. या पार्श्वभूमीवर संघटनेने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

ज्येष्ठतेच्या आधारे कामगारांना काम द्यावे. नवीन भरती थांबवावी. तसेच अन्यायकारक कामगार पद्धतींवर तत्काळ बंदी घालावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लैला शुगर्सतर्फे कामगारांवर अन्यायकारक पद्धत राबवून त्यांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. हा सहकारी साखर कारखाना असून, तो लैला शुगर्स कंपनीला लीजवर देण्यात आला आहे. करारानुसार, सर्व कामगारांना सातत्याने रोजगार देणे आवश्यक आहे. मात्र, व्यवस्थापनाकडून नवीन रोजंदारी कामगारांची भरती करून जुन्या व वरिष्ठ हंगामी कामगारांना डावलले जाते. याबाबतच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here