केरळ: ऊसाच्या पारंपरिक को ४१३ प्रजातीकडे पुन्हा शेतकऱ्यांचा कल

178

इदुक्की : कुडायाल येथील जगदीश्वरन यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पारंपरिक को ४१३ या प्रजातीच्या उसाची तोडणी केली आहे. मरयूरमधील शेतांमधून या प्रजातीचा ऊस जवळपास गायबच झाला होता. जगदीश्वर यांची सुमारे दोन एकर शेती आहे. त्यांनी सांगितले की, या प्रजातीचा ऊस अधिक उत्पन्न देतो आणि बदलत्या हवामानात तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये टिकून राहतो. जगदीश्वरन यांनी या प्रजातीच्या उसाची आधीची लागवड केली होती. पाणी कमी असताना या प्रजातीचा ऊस टिकून राहतो. मात्र, हवामान बदल आणि पाण्याच्या कमतरतेमुळे नव्या प्रजातींच्या उसाचे उत्पादन घटत असल्याचे दिसून आले आहे.

इतर प्रजातीचा ऊस नऊ ते दहा महिन्यांत वाढीच्या तुलनेत या उसाचा १२ ते १४ महिने वाढीसाठी गरजेचे असतात. यासाठी कमी खतांची गरज भासते आणि आयु्र्वेदिक औषध निर्मिती कंपन्या पारंपरिक प्रजातीच्या उसाचे मुख्य खरेदीदार होते. या प्रजातीच्या गुळाची शुद्धता अधिक असल्याचा आणि त्याला अधिक पसंती मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी खूप प्रयत्नांनंतर या प्रजातीच्या उसाची लागवड केली आहे.

भौगोलिक स्थाननिश्चीतीचे मानांकन मिळाल्यानंतर मरयूर गुळाच्या वितरणासाठी नियुक्त केलेल्या तीन एजन्सींपैकी एक असलेल्या मॅप्कोचे (मरयूर अॅग्रीकल्चर प्रोड्यूसर कंपनी) सेल्विन मरियप्पन म्हणाले, याआधी वीस शेतकऱ्यांनी याची लागवड केली आहे. को ४१३ या प्रजातीला कमी पाणी लागते. किडींच्या हल्ल्याच्या समस्येबरोबरच मूळ धरण्याची क्षमता अधिक आहे. मात्र, या प्रजातीसाठी अधिक कालावधी लागतो. मॅप्को या प्रजातीच्या उसाची ८५,००० रोपे शेतकऱ्यांना देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here