कोल्हापूर : जिल्ह्यात १ लाख २४ हजार बायोगॅस युनिटची बांधणी, देशात पटकावले अव्वल स्थान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याने १ लाख २४ हजार १४४ बायोगॅस युनिटची यशस्वी बांधणी करून देशात अव्वल स्थान पटकावले. १९८२ पासून जिल्हा परिषदेने राबवलेल्या प्रभावी धोरणामुळे ३४२ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे अनेक तालुके गोठ्यातील पशुधनाचा वापर करून गोबर गॅस प्रकल्प राबवत आहेत. सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलिंडरसाठी ४५ दिवसांचे बुकिंग वेटिंग सुरू असल्याने गृहिणींचे नियोजन कोलमडले आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील बायोगॅस क्षेत्रातील ही कामगिरी चर्चेत आली आहे.

जिल्ह्यात अनेक गावे १०० टक्के बायोगॅसयुक्त आहेत. यामध्ये भुदरगड-महालवाडी, चंदगड-मोरेवाडी, गडहिंग्लज-हेळेवाडी, कागल-फराकटेवाडी, पन्हाळा-कुंभारवाडी व महाडिकवाडी, शाहूवाडी-कातळेवाडी, आजरा-मोरेवाडी, चौधरवाडी, हातकणंगले-निलेवाडी, करवीर-शेळकेवाडी यांचा समावेश होतो. यापैकी जवळपास १ लाख ६७३ युनिच शौचालयास जोडलेली आहेत. आतापर्यंत यासाठी ३४२ कोटी ३० लाख रुपये अनुदानाचे वितरण झाले आहे. तर गेल्या पाच वर्षात ४ हजार ४४३ नवीन संयंत्रे बांधली गेली आहेत. घरच्या शेणापासून गॅस आणि शेतीला मोफत खत मिळत असल्याने प्रकल्प फायदेशीर आहे असे किसरूळ येथीस शेतकरी सर्जेराव पाटील सांगतात. कृषी विकास अधिकारी राजेंद्र माने यांनी पर्यावरण संतुलन आणि शाश्वत इंधनाचा हा खात्रीशीर पर्याय असून, सेंद्रिय शेतीला मिळणारी मोठी चालना ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी क्रांतिकारी ठरत आहे, असे दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here