कोल्हापूर : विभागात ६५० कोटी एफआरपी थकीत, शेतकऱ्यांना बसतोय व्याजाचा भुर्दंड !

कोल्हापूर : राज्य सरकारकडून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प मुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीत केल्यास केंद्र आणि राज्य शासनातर्फे प्रत्येकी तीन टक्के प्रमाणे एकूण ६ टक्के सरसकट व्याज सवलत दिली जाते. पीक कर्जाची उचल केल्यापासून ३६५ दिवसांत कर्जाची परतफेड करावी लागते.दैनिक ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे कि, कोल्हापूर, सांगलीतील बहुतांश शेतकरी विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा बँकेकडून पीक कर्ज घेतात. साधारणत: फेब्रुवारी, मार्चमध्ये कर्जाची उचल होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्चअखेर कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. तरच त्यांना पंजाबराव देशमुख योजनेंतर्गत व्याज सवलत मिळेल, पण विभागात सद्यस्थितीत ६५० कोटी एफआरपी थकीत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागातील २१ साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. एफआरपी थकीत असल्याने शेतकऱ्यांना पीक कर्जाची मुदतीत परतफेड करणे मुश्कील बनले आहे. मुदतीत कर्जाची परतफेड न केल्यास संबंधित शेतकऱ्यांना व्याज परतावा मिळणार नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ६ टक्के व्याज भरावे लागणार आहे. जवळपास ६५० कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे, त्याचा विचार करता, शेतकऱ्यांना सुमारे ४० कोटी रुपये व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here