सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याकडून आणखी १०० रुपयांचा उसाचा हप्ता जमा

सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने गेल्यावर्षी, सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित बिलापोटी प्रतिटन १०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या बँक व पतसंस्थेतील खात्यावर ९ नोव्हेंबरपासून ही रक्कम जमा होणार आहे. उर्वरित ५० रुपये निधी उपलब्धतेनुसार लवकरच देण्यात येणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील व व्हाइस चेअरमन तानाजी खरात यांनी दिली. यंदाचा २०२६-२७ चा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे सुरू असून, परिसरातील अन्य कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

चेअरमन पाटील म्हणाले की, कारखान्याने हंगामाच्या सुरुवातीला प्रतिटन ३,००० रुपये ऊसदर जाहीर केला होता. हंगाम संपल्यानंतर १५ दिवसांत प्रतिटन २,८५० रुपये अदा केले. उर्वरित १५० रुपयांपैकी आता १०० रुपये दिले जात असून, उर्वरीत रक्कम नंतर दिली जाईल. महाराष्ट्र व कर्नाटकातील गेटकेन क्षेत्रातील ऊस उत्पादकांचाही यामध्ये समावेश आहे. मागणीनुसार वैयक्तिक धनादेशाची सुविधाही उपलब्ध आहे. यावेळी व्हाइस चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर व प्रभारी कार्यकारी संचालक रमेश जायभाय रपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here