कोल्हापूर : आम आदमी पार्टीच्यावतीने पेट्रोल पंपांवर सुरू असलेल्या २० टक्के इथेनॉल मिश्रित ( ई-२०) पेट्रोलच्या सक्तीविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी या निषेध आंदोलनादरम्यान, एका गाडीची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी ‘आप” प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, अरुण गळतगे, उत्तम पाटील अभिजित कांबळे, सूरज सु मोईन मोकाशी, विजय हेगडे, प्रसाद सुतार, अमरसिंह दळवी, एस्तेर कांबळे, राकेश गायकवाड, संजय नलवडे आदी उपस्थित होते.
बसंत-बहार टॉकीजजवळील पेट्रोल पंपापासून सुरू झालेली ही अनोखी अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. या आंदोलनाने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या केल्या. प्रत्येक पेट्रोल पंपावर ई-२० शुद्ध पेट्रोलचा पर्याय त्वरित उपलब्ध करून द्यावा. ग्राहकांना पेट्रोलच्या किमती शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असाव्यात. ग्राहकाला त्याच् वाहनानुसार ई-०, ई-१० किंवा ई-२० असे इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य असावे असे निवेदना म्हटले आहे.


















