कोल्हापूर : अन्नपूर्णा शुगरचे अडीच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; वाहतूक कराराला प्रारंभ

कोल्हापूर : अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्सने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. वेळेत आणि पारदर्शकपणे करार पूर्ण करून यंदा विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी विश्वासाने व एकजुटीने काम करावे, असे आवाहन ‘गोकुळ’चे संचालक,’अन्नपूर्णा’चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अंबरीश घाटगे यांनी केले. केनवडे (ता. कागल) येथील या कारखान्यात आगामी २०२६-२०२७ या गळीत हंगामासाठी ऊसतोडणी आणि वाहतूक करारांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार संजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली २.५ लाख ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण करण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प कारखान्याने केला आहे. त्याची माहिती अंबरीश घाटगे यांनी दिली. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दंडवते, संजीव नाईक, तानाजी तिकोडे, तुकाराम माणगावकर बाबूराव भोसले यांच्यासह कारखान्याचे ऊसतोडणी वाहतूकदार पदाधिकारी, ठेकेदार, शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here