कोल्हापूर : ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी जेके इंडिया ईॲग्रीटेकने विशेष सुरक्षा उपक्रम राबविला. लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना आणि कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्यात आले. ऊस वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रॅक्टर-ट्रॉलींच्या पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका निर्माण होतो. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी ‘जेके इंडिया’तर्फे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमात कारखाना संचालक विरेंद्र मंडलिक, कार्यकारी संचालक एन.वाय.पाटील, जेके इंडिया ईॲग्रीटेकचे पारस पाटील, अक्षय पाटील, कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. संचालक विरेंद्र मंडलिक म्हणाले कि, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित देखभाल ठेवावी, जेणेकरून आपल्या वाहनातील बिघाडामुळे अपघात होणार नाहीत. वाहनचालकांनी ट्रॅक्टरचा वेग मर्यादित ठेवून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. जवाहर कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कार्यक्रमावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले, शेती अधिकारी कांबळे यांच्या अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत. यावेळी दोन्ही कारखान्यांवर ‘चीनीमंडी’च्या अंकाचेही वितरण करण्यात आले.

















