कोल्हापूर : ‘पंचगंगा’च्या कामगारांना १९ महिन्यांचा फरक अदा; १० टक्के पगारवाढीची अंमलबजावणी

कोल्हापूर : राज्य शासनाच्या निर्णयानुसार साखर उद्योग व जोडधंद्यातील कामगारांना १ एप्रिल २०२४ पासून १० टक्के पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गंगानगर (कबनूर) येथील दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्यातील सर्व कामगारांना १ नोव्हेंबर २०२५ पासून १० टक्के पगारवाढ लागू करण्यात आली आहे. तसेच १ एप्रिल २०२४ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या १९ महिन्यांच्या कालावधीतील फरकाची रक्कम दि.४ ऑगस्ट २०२६ रोजी एकरकमी सर्व कामगारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली. त्यामुळे कामगारातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

कामगारांना फरकाची रक्कम वेळेत मिळाल्याबद्दल पंचगंगा साखर कामगार संघ इंटकच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील यांचा कार्यस्थळावर सत्कार करण्यात आला. इंटकचे अध्यक्ष आझाद शेख यांच्या हस्ते हा सत्कार झाला. यावेळी श्री रेणुका शुगर्सचे केन विभागाचे जनरल मॅनेजर सी. एस. पाटील, इंटकचे अध्यक्ष आझाद शेख, सचिव दीपक साखरे, सदस्य सुनील कुंभार, विजय पाटील, प्रकाश कांबळे, मारुती हणबर, विजय सुतार, सुभाष कुंभार, प्रदीप पाटील, इंटक सेवक श्रीशैल व्हसमनी तसेच कारखान्यातील कर्मचारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here