कोल्हापूर : आवाडे जवाहर कारखान्याच्यावतीने महालक्ष्मी ग्रीन एनर्जी प्रकल्पाची प्रकाश आवाडे यांची घोषणा

कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याची ३७ वी सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात झाली. कारखान्याच्या सभेत माजी मंत्री तथा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, डॉ. राहुल आवाडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी आदी उपस्थित होते. कारखाना परिसरात वेस्टपासून बेस्ट निर्मिती करणारा देशातील पहिला तीन हजार कोटींचा महालक्ष्मी ग्रीन एनर्जी प्रकल्प सुरू होणार असून यातून शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारक बदल होतील, असा विश्वास आवाडे यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पांतून प्रतिदिन पोटॅश व सायट्रिक अॅसिड प्रत्येकी २०० टन व बायोगॅस २० टन उत्पादन होणार असून शेतकऱ्यांना पोटॅश खते स्वस्तात मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

आवाडे यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून सहकार्य केल्यामुळेच जवाहर साखर कारखान्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. हे टिकवून ठेवण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. जवाहर साखर कारखाना ऊस पीक व्यवस्थेत देशात एक नंबर आहे. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी नवा प्रकल्प राबवला जात असल्याचे ते म्हणाले. सभेत कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी नोटीस वाचन केले. जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाल्याने कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार डॉ. राहुल आवाडे, चेअरमन स्वप्निल आवाडे, उत्तम आवाडे, सपना आवाडे, मौसमी आवाडे, बाबासाहेब चौगुले, सरपंच संगीता नरदे आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here