कोल्हापूर : आजरा कारखान्याच्या सभासदांना साखरेचे वाटप करणार – अध्यक्ष देसाई यांची माहिती

कोल्हापूर : गवसे येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्यावतीने सभासद व टनेज साखर वाटप करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कारखान्याकडे १५ हजार शेअर्स रक्कम असणाऱ्या ‘अ’ व ‘ब’ वर्ग सभासदांना प्रत्येकी ५० किलो साखर, १० हजार रुपये शेअर्स जमा असलेल्या सभासदांना प्रत्येकी २५ किलो, तर ७हजार रुपये शेअर्स असणाऱ्या सभासदांना प्रत्येकी १५ किलो साखर वाटप केली जाणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई यांनी ही माहिती पत्रकातून दिली आहे.

अध्यक्ष देसाई म्हणाले की, गडहिंग्लज, चंदगड, कर्नाटक, आंबोली, गारगोटी गेटकेनमधून आलेल्या उसाची टनेज साखर कारखाना कार्यस्थळावरून वाटप केली जाणार आहे. कारखान्याच्या धोरणाप्रमाणे साखर वाटपाचा लाभघ्यावा, कारखान्याच्या सभासदांनी अपूर्ण शेअर्स रक्कम पूर्ण भरावी. कारखान्याच्या २०२५-२६ गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा केलेल्या सभासदांना २५ रुपयांप्रमाणे प्रतिटन अर्धा किलो साखर सवलतीच्या दरात वाटप केली जाणार आहे. तालुका खरेदी-विक्री संघाच्या संबंधित शाखांमध्ये साखर वाटप केली जाईल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here