कोल्हापूर : आजरा कारखान्याने ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी

कोल्हापूर: चालू वर्षी वाढलेले खतांचे व औषधांचे दर, ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार यांच्याकडून ऊसतोडणीसाठी झालेली आर्थिक पिळवणूक, वाढलेली मजुरी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे आजरा सहकारी साखर कारखान्याने गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला प्रति टन ४०० रुपयांचा दुसरा हप्ता जमा करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने केली आहे. याबाबत संघटनेच्यावतीने संचालक संभाजी सावंत यांना निवेदन देण्यात आले.

स्वाभिमानी संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या हंगामात तुटलेल्या उसाच्या साखरेसह उपपदार्थांना वर्षभर उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे कारखान्याने उसाला प्रति टन ४०० रुपये दुसरा हप्ता द्यावा. हा हप्ता न दिल्यास उपपदार्थ रोखण्यात येतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देताना तानाजी देसाई, सखाराम केसरकर, कृष्णा पाटील, चंद्रकांत कोरगावकर, मारुती पाटील, परशराम आपगे, राणोजी कुंभार, भीमगोंडा पाटील, नरेंद्र कुलकर्णी, पांडुरंग सावंत, भिकाजी पाडेकर, चालू केंगारे, निवृत्ती कांबळे, धोंडिबा सावंत आदींसह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here