कोल्हापूर : वारणा कारखान्याचा गळीत हंगाम सुरू, ऊस बिलाचा मागील हंगामातील ११९ रुपयांचा हप्ता लवकरच देणार

कोल्हापूर : श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याकडे गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपासाठी आलेल्या उसाला प्रतिमेट्रिक टन ३,५४४ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. त्यापैकी प्रति मेट्रिक टन ३,४२५ रुपये दराने ऊसबिलाची रक्कम यापूर्वी शेतकऱ्यांना अदा केली आहे. ऊसबिलाचा उर्वरित प्रतिटन ११९ रुपयांचा हप्ता २६ ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. कारखान्याच्या ६८ व्या गळीत हंगामाचा दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यंदाचा गळीत हंगाम पूर्ण तांत्रिक कार्यक्षमतेने चालवून १३ लाख मे. टनांहून अधिक ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले असल्याची माहिती डॉ. कोरे यांनी दिली.

कार्यक्रमात उसाचे व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे पूजन आणि वाहनचालकांचा सत्कार आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते झाला. गळीत हंगाम प्रारंभ गट १ मधून जयप्रकाश जयसिंगराव जगदाळे (मोहरे), गट २ मधून जगन्नाथ धोंडी पाटील (केखले), गट ३ मधून कुंडलिक वसंत कुंभार (भेंडवडे), गट क्रमांक ४ मधून कुमार पांडुरंग शेळके (कुंडलवाडी), गट ५ मधून गणपतराव शामराव पाटील (करंजवडे) या कारखाना कार्यक्षेत्रातील पाच गटांतील शेतकऱ्यांच्या आणि आमदार डॉ. कोरे यांच्या हस्ते झाला. यंदाचा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण करून उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व शेतकरी सभासदांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here