महाराष्ट्र : एफआरपी थकवल्याप्रकरणी आणखी तीन साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई; शेतकऱ्यांचे २५५.१८ कोटी रुपये अडकले

पुणे : ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी (योग्य व रास्त दर) वेळेत न भरलेल्या आणखी तीन साखर कारखान्यांच्या मालमत्तेवर जप्ती (आरआरसी) आणण्याचे आदेश राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिले आहेत. २०२५-२६ च्या गाळप हंगामात एफआरपी थकवल्यामुळे आरआरसीची कारवाई झालेल्या साखर कारखान्यांची संख्या आता १० वर पोहोचली आहे.साखर आयुक्तांनी महसूल विभागाला संबंधित कारखान्यांच्या मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे एकूण २५५ कोटी १८ लाख रुपये वसूल करून त्यांचे वितरण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महसूल विभागाने जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे.

नाशिक येथील अष्टलक्ष्मी शुगरने ६०,३०४ टन ऊस खरेदी केला होता. या उसासाठी कारखान्याने शेतकऱ्यांना १३.२० कोटी रुपये एफआरपी देणे आवश्यक होते. मात्र, केवळ १०.५८ कोटी रुपये अदा करण्यात आले असून २.६२ कोटी रुपये अद्याप थकीत आहेत.सोलापूरमधील कमलाभवानी साखर कारखान्याने ४ लाख २१ हजार ५१६ टन उसाचे गाळप केले. या प्रमाणानुसार १००.९८ कोटी रुपये एफआरपी देणे अपेक्षित असताना कारखान्याने फक्त ९१.१७ कोटी रुपये अदा केले. सुमारे ९ कोटी रुपयांची थकबाकी राहिल्याने या कारखान्याच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

धाराशिव येथील विठ्ठलसाई साखर कारखान्याने शेतकऱ्यांना ६५.४७ कोटी रुपये एफआरपी दिली. मात्र, ३ लाख १४ हजार ७५५ टन ऊस गाळपाच्या तुलनेत १०.७६ कोटी रुपये एफआरपी थकीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी साखर आयुक्तालयात झालेल्या सुनावणीत कारखाना प्रशासन समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाही. त्यामुळे या कारखान्यावरही आरआरसी अंतर्गत जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here