महाराष्ट्र : राज्यात साखर कारखाने उभारणार सीबीजी प्रकल्प, १८ मे ला साखर आयुक्तालयात बैठक

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी प्रेसमडपासून सीबीजी निर्मिती करावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. साखर कारखान्यामध्ये सीबीजी निर्मिती प्रकल्प उभारण्याबाबत पुढाकार घेणे आवश्यक असल्याने त्याकरिता सीबीजी निर्मिती प्रकल्प उभारणी करुन देणाऱ्या कंपन्या, प्रकल्पासाठी कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या संस्था आणि तांत्रिक सहाय्य देणाऱ्या संस्था यांची दि. १४/०५/२०२६ रोजी सकाळी ११:३० ते १:३० या वेळेत साखर आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर येथे परिसंवाद / बैठक आयोजित करण्यात आलेली होती. तथापि १४ मे रोजी आयोजित केलेली बैठक प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आली असून पुढील बैठक आता दि. १८ मे २०२६ रोजी सकाळी ११:३० ते १:३० या वेळेत होणार आहे.

तरी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन सहसंचालक (उपपदार्थ) अविनाश देशमुख यांनी केले आहे. तसेच ज्या साखर कारखान्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल अशा साखर कारखान्यांनी सदर बैठकीस ऑनलाईन उपस्थित रहावे, असे सांगण्यात आले आहे. या बैठकीची लिंक पुढे देण्यात आलेली आहे. -https://meet.google.com/key-bwab-qhf

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here