केरळ: मजुरांच्या कमीमुळे गुळ उत्पादनावर संकट

इडुक्की: कोरोना वायरस महामारी मुळे केरळच्या इडुक्की च्या प्रसिद्ध मारयुर गुळा समोर मजुरांच्या कमीमुळे गंभीर संकट निर्माण झाले आहे. कोरोनामुळे तामिळनाडू च्या मजुरांनी पलायन केले आहे. ज्यामुळे एप्रिलपासून पीकाची कापणी आणि गुळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

मारयूर आणि कंथल्लूर गावांमध्ये 600 हेक्टर पेक्षा अधिक जमीनीवर ऊसाची शेती केली जाते. येथील शेतकरी तामिळनाडूच्या मजुरांवर अवलंबून आहेत, आणि लॉकडाउन च्या घोषणेनंतर मजुरांनी येणे बंद केले आहे. मारयूरमध्ये साधारणपणे ऊसाची कापणी रोटेशन नुसार केली जाते. ज्यामुळे मारयूर मध्ये पूर्ण वर्षामध्ये गुळाचे उत्पादन होते. सध्या मजुरांच्या संकटाने पीकाची कापणी प्रक्रिया प्रभावित झाली आहे. आणि एप्रिलमध्ये कापणी केले जाणारे पीक आताही शेतात आहे. जर रोटेशन तुटले, तर शेतकर्‍यांना मोठे नुकसान होवू शकते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here