नाशिक : साखर कारखाने वाचवण्यासाठी ‘एमएसपी’ वाढविण्याची ‘नासाका’च्या माजी अध्यक्षांची मागणी

नाशिक : देशभरातील ऊस उत्पादकांना भाव चांगला मिळावा म्हणून केंद्र दरवर्षी एफआरपी वाढवते. साखरेची एमएसपी मात्र गेली ६ वर्षे ३१ रुपये किलोवरच स्थिर आहे. त्यामुळे कारखाने तोट्यात जाऊन कर्जबाजारी होत आहेत. केंद्राने विनाविलंब साखरेची एसएमपी ८० ते ९० रुपये प्रतिकिलो करावी व निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी नाशिक सहकारी साखर कारखान्याचे (नासाका) माजी अध्यक्ष तानाजी गायधनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गायधनी म्हणाले, केंद्राने देशांतर्गत भाववाढ रोखण्यासाठी साखर निर्यातबंदी केली. निर्यातबंदी होताच व्यापाऱ्यांनी क्विंटलमागे १०० रु. भाव पाडले. देशात साखरेचा वार्षिक खप ३१० लाख मे. टन असताना साठा कित्येक पट जास्त आहे. किमान १५ ते २० लाख मे. टन निर्यातीस परवानगी द्यावी, अशी मागणीही गायधनी यांनी केली. ते म्हणाले, यंदाच्या हंगामात आर्थीक अडचणीमुळे राज्यातील अनेक कारखान्यांना एफआरपी देणे शक्य झाले नाही. कामगारांचे पगार व इतर देणी थकली आहेत. एमएसपी न वाढवल्यास देशातील व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मालकीचे साखर उद्योग बंद पडून शेतकरी कामगार देशोधडीला लागतील, असा इशारा गायधनी यांनी दिला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here