नाशिक : रावळगाव साखर कारखाना प्रशासनाला ऊस बिले वेळेत न दिल्याबद्दल आमदारांनी सुनावले

नाशिक : मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथील एस.जे. शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन पाच महिने उलटले तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले देण्यात आलेली नाहीत. थकीत ऊस बिलप्रश्नी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी मालेगाव येथे बैठक घेत कारखाना प्रशासनाला धारेवर धरले. शेतकरी आणि कामगारांच्या भावनांशी खेळू नका, अन्यथा होणाऱ्या तीव्र परिणामांना कारखाना प्रशासन जबाबदार राहील, अशा कडक शब्दांत चव्हाण यांनी दिला आहे.

या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, साखर उपसंचालक संजय गोंडे, प्रांताधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे, कारखान्याचे सरव्यवस्थापक प्रशांत मोहिते, शेती अधिकारी शिवाजी देसाई, भाजप नेते बंडूकाका बच्छाव,शेतकरी प्रतिनिधी माधवराव पाटील, ऊसतोड मुकादम प्रतिनिधी दरबारसिंग राजपूत, वाहतूक मुकादम प्रतिनिधी समाधान माळी यांच्यासह चाळीसगाव,भडगाव,पाचोरा, मालेगाव आणि सटाणा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

गेल्या वर्षीचा १५० रुपये प्रति टन फरक देण्याचे आश्वासन देऊनही नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ पासून आजतागायत शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळालेला नाही. शेतकरी व मुकादम यांच्या व्यथा ऐकल्यावर आमदार चव्हाण संतप्त झाले. कारखान्याचे संचालक मोहम्मद हारून शेख यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून सर्व मागण्या मान्य केल्या आणि विहित कालावधीत थकबाकी देण्याचे लेखी आश्वासन देखील दिले. त्यानुसार, गळीत हंगाम २०२५-२६ मधील देयके ३ मे २०२६ पर्यंत, तर २०२४-२५ मधील १५० रुपये प्रति टन भाव फरक १५० मे २०२६ पर्यंत अदा करण्यात येणार आहे. तसेच ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदारांची देयके १५ मे पर्यंत अदा केली जाणार आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here