नाशिक : ऊस दर जाहीर होईपर्यंत तोडणी न करण्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आवाहन

नाशिक : नाशिक जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही, त्यामुळे उत्पादन खर्च भरून निघेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अशा परिस्थितीत १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, उसाची पुरेशी वाढ होण्यापूर्वी तोड झाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या उसाला पाणी देऊन वाढ होण्यास वाव असून, पुढील हंगामासाठी खोडवे राखण्याच्या दृष्टीनेही शेतकऱ्यांना नियोजन करावे लागणार आहे. अशा स्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, साखर व इथेनॉलचे दर निश्चित करावेत आणि ऊसदर जाहीर होईपर्यंत कारखानदारांनी ऊसतोड सुरू करू नये, अशा मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केल्या.

यावर चर्चेसाठी कोळगाव (ता. निफाड) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. केंद्र व राज्य सरकारने संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या व शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, तोपर्यंत कारखान्यांना ऊस न देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखाना, सहकारमहर्षी शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, रानवड सहकारी साखर कारखाना तसेच ग्रेनाँच इंडस्ट्रीज लि. केजीएस शुगर अँड बायो एनर्जीज लिमिटेड या कारखान्यांनी ऊसदर जाहीर होईपर्यंत ऊसतोड सुरू करू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय होईपर्यंत ऊसतोड करू नये, अशी भूमिका कोळगाव येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आली.

ChiniMandi WhatsApp Channel

कोळगाव व खेडले झुंगे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या भूमिकेला पाठिंबा देत कारखान्यांना ऊस न देण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे-पाटील, निफाड तालुकाध्यक्ष गजानन आबा घोटेकर, कोळगाव सोसायटीचे चेअरमन प्रताप घोटेकर, दत्तात्रय घोटेकर, दत्तात्रय गोरडे, नामदेव घोटेकर, सुदाम साबळे, वाळू विश्वनाथ घोटेकर, अशोक गीते, दीपक घोटेकर, सागर गवळी, संतोष तासकर, सुनील गवळी, केदारनाथ घोटेकर, संतोष घोटेकर, हौशीराम घोटेकर आदी उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here