फिजी: शुगरकेन ग्रोवर्स फंडाच्या अध्यक्षपदी उदय सेन

फिजी : फिजी चे पंतप्रधान आणि शुगर इंडस्ट्रि मिनिस्टर वोरके बैनीमारमा यांनी उदय सेन यांना शुगरकेन ग्रोवर्स फंडाच्या (एससीजीएफ) अध्यक्षपदी नियुक्त केले आहे. पंतप्रधानांनी सेन यांच्या 2019 च्या बोर्ड सदस्य म्हणून केलेल्या कामाचा गौरव केला.

उदय सेन यांचे फिजी च्या साखर उद्योगामध्ये महत्वपूर्ण योगदान आहे. साखर उद्योग मंत्रालयाचे स्थायी सचिव योगेश करण यांनीदेखील सेन यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, सेन एक चांगले व्यक्ती आहेत. तसेच शुगर इंडस्ट्रि चे दिग्गज अधिक़ारी आहेत.

सेन यांनी आपल्या नियुक्ती वर प्रधानमंत्री आणि करण यांना धन्यवाद दिले. सेन यांनी शुगरकेन ग्रोवर्स फंडाला नव्या उंचीवर घेवून जाण्यामध्ये बोर्ड, व्यवस्थापन, कर्मचारी आणि इंडस्ट्रि च्या भागीदारांकडून सहकार्याची विनंती केली आहे.

सेन सिटी कार्स अ‍ॅन्ड इक्विपमेंट चे मुख्य निदेशक आहेत. त्यांनी पूएसपी कडून लेखा आणि सूचना प्रणाली मध्ये बॅचलर ऑफ आर्टस ची पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी यूएसपी कडून बँकींग मध्ये स्नातकोत्तर डिप्लोमा, पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा आणि अकाउंटींग मध्ये मास्टर ऑफ कॉमर्स डिग्री घेतली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here