‘नवभारत विकसित २०२६’ पुरस्काराने ओंकार शुगर ग्रुपचा देशपातळीवर गौरव, ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे-पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार

नवी दिल्ली : ‘नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२६’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय व्यासपीठावर ‘नवभारत विकसित २०२६’ पुरस्काराने दिल्ली विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या हस्ते ओंकार शुगर ग्रुपला सन्मानित करण्यात आले. ओंकार शुगर ग्रुपतर्फे हा पुरस्कार ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे-पाटील यांनी स्वीकारला. यावेळी संचालक ओमराजे बोत्रे-पाटील म्हणाले कि, हा सन्मान माझ्यासाठी व संपूर्ण ओंकार शुगर ग्रुपसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. हा सन्मान विश्वासाचा आणि समाजसेवेप्रती असलेल्या बांधिलकीची पोहोचपावती आहे.

‘नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026’ हा कार्यक्रम 7 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथील भीकाजी कामा प्लेस येथे आयोजित करण्यात आला होता. भारताला जागतिक नेतृत्व, आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल नवोपक्रम आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने नेण्याच्या उद्दिष्टावर या परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार मांडले. नवभारत विकसित भारत लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026 हा धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ, उद्योजक, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांना एकत्र आणून विकसित भारताच्या रोडमॅपवर अर्थपूर्ण चर्चा घडवून आणणारा महत्त्वाचा मंच ठरला.

ChiniMandi WhatsApp Channel

या पुरस्काराबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना संचालक ओमराजे बोत्रे-पाटील म्हणाले कि, ओंकार शुगर ग्रुप देश आणि राज्याच्या साखर उद्योगात महत्वाची भूमिका पार पाडत आहे. ग्रुपच्या माध्यमातून देशभरातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचे काम अविरतपणे सुरु आहे. त्याचबरोबर ओंकार शुगर ग्रुपने रोजगाराच्या हजारो संधी निर्माण केल्या आहेत. ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे साखर कारखानदारीला बळ मिळाले आहे. चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही साखर उद्योगाच्या भरभराटीसाठी प्रयत्न केला जाईल.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here