पाकिस्तान : बिस्कीट कारखान्यातून ४०,००० किलो सरकारी साखर जप्त

मुल्तान : जिल्हा प्रशासनाने सरकारी साखर घोटाळाप्रकरणी कारवाई सुरू केली आहे. या अंतर्गत मुमताजाबाद विभागातील एका प्रसिद्ध बिस्कीट कारखान्यातून ४०,००० किलो साखर जप्त करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त कहवाजा उमैर यांनी मिळालेल्या एका गोपनिय माहितीच्या आधारे कारखान्यावर धाड टाकली. या कारवाईत ३५ लाख रुपयांहून अधिक किमतीची सरकारी आयात साखर जप्त करण्यात आली. कारखाना सील करण्यात आला असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले.

सरकारी पथकाने गोदामात साखर दिल्याच्या आरोपावरून एका संशयीतास पकडले आहे. त्याला अटक करण्यात आली असून उपायुक्त आमिर करीम खान यांच्या निर्देशानुसार, कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने कारखान्यात ७८० पोती साखर पुरवठा करणाऱ्या वितरकाविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here