ऊस वाहतुकीचे थकलेले भाडे द्या; अन्यथा शनिवारी आत्मदहन करू : वाहतूकदार, वाहन मालकांचा कारखाना प्रशासनाला इशारा

धाराशिव : कळंब तालुक्यातील हावरगाव येथील डीडीएन एसएफए लि. साखर कारखान्याकडून २०२५-२६ च्या गळीत हंगामातील ऊस वाहतुकीचे भाडे अद्याप मिळाले नसल्याने ऊस वाहतूकदार, वाहनमालक आणि चालक आक्रमक झाले आहेत. थकीत रक्कम तातडीने अदा न केल्यास १७ जुलै रोजी कारखान्यासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित वाहतूकदारांनी दिला आहे. त्यामुळे आता कारखाना प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

२०२५-२६ च्या गळीत हंगामात कारखान्यासाठी ऊस वाहतूक केलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात भाडे आहे. अनेक वेळा कारखाना प्रशासनाकडे थकीत रक्कम देण्याची मागणी करूनही अद्याप पेमेंट मिळाले नाही. ऊस वाहतुकीसाठी वाहनमालकांना डिझेल, वाहनांचे हप्ते न मिळाल्यामुळे बँकेचे कर्ज, वाहनांची दुरुस्ती आणि इतर खर्च भागवणे अवघड झाले आहे. मालक-चालक यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह भागवणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर ऊस वाहतूकदार आणि चालकांनी कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देऊन थकीत ऊस वाहतूक भाड्याची रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास १७ जुलै रोजी कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करून आत्मदहन करू, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here