पेरंबलूर : साखर कारखान्यापर्यंत ऊस नेण्यास होतोय उशीर

पेरंबलूर : वर्ष २०२२-२३ मध्ये ऊसाच्या गळीत हंगाम दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केल्यानंतरही येथील शेतकऱ्यांचा ऊस पेरुंबलूरच्या ओरीयूर साखर कारखान्यांपर्यंत पोहोचण्यास अभुतपूर्व उशीर होत असल्याचे वृत्त दि न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, ट्रक येण्यास उशीर होत असल्याने तोडलेला ऊस एक अथवा दोन दिवसांपेक्षा अधिक काळात शेतांमध्येच ठेवावा लागत आहे. खरेतर ओरीयूर साखर कारखान्याच्या उसाचे गाळप डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होते. आणि या हंगामात हे गाळप २२ डिसेंबर रोजी सुरू झाले आहे.

पेरंबलूर, अरियालूर, कल्लाकुरिची आणि कुड्डालोर जिल्ह्यात १२,००० एकर शेतांमध्ये उत्पादित जवळपास ३.६० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. अशा स्थितीत पुडूर, नमय्यूर, मुरुक्कानगुडी, पोनगरम आणि किलापुलियूरसह अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाकडून होणाऱ्या उशीराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना जिल्हा प्रशासनाला तत्काळ कार्यवाही करण्याचा आग्रह केला आहे. उशीर होत असल्याने जवळपास २.५ एकर जमिनीवरून तोडण्यात आलेला ऊस येथील कारखान्यांऐवजी तंजावूर साखर कारखान्यात नेण्यात आला. उर्वरित ऊस अद्याप शेतांमध्ये आहे. पिक तोडून दोन दिवस उलटले आहेत आणि आम्ही ट्रक येण्याच्या प्रतीक्षेत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here