महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातमध्ये कारखाने सुरू करण्याचे नियोजन : चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील

बीड : परळी वैजनाथ तालुक्यातील पांगरी येथील ओंकार साखर कारखान्याच्या आगामी गाळप हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन, काटा पूजन, गव्हाण पूजन आणि मोळी पूजनाचा कार्यक्रम ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते नुकताच झाला. यावेळी ओंकार शुगर ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस्विनी बर्गे, भाजपचे परळी तालुकाध्यक्ष राजेश गित्ते, नितीन समशेट्टी, पोलिस पाटील ज्ञानोबा मुंडे, ऊस उत्पादक रमेश घोडके, विष्णू तांबडे, तोडणी-वाहतूक ठेकेदार समशेर अब्दुल शेख, राजेभाऊ राठोड, कारखान्याचे अधिकारी सागर मार्तंडे आदी उपस्थित होते.

दुष्काळी परिस्थितीतही कारखान्याचा गाळप हंगाम सुरू केल्याबद्दल राजेश गित्ते यांनी बाबूराव बोत्रे-पाटील यांचे अभिनंदन केले. कारखाना सुरू झाल्यामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी-वाहतूक ठेकेदार आणि कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले, ओंकार शुगर ग्रुप शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आहे. आगामी काळात महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातमध्ये कारखाने सुरू करण्याचे नियोजन आहे. मागील काळात काही आर्थिक अडचणींमुळे ऊसबिलांच्या देयकांना विलंब झाला असला, तरी शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता ओंकार कारखान्याला ऊस पुरवठा करावा. आगामी हंगामात उच्चांकी दर देण्याचा प्रयत्न केला जाईल.प्रास्ताविक जनरल मॅनेजर सुधाकर सोळंके, आभार मुख्य शेतकी अधिकारी जगन्नाथ शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला शेतकरी, तोडणी-वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे अधिकारी, खातेप्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here