पुणे : नारायणगाव येथे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र आणि पी. टू.व्ही. जर्नी यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादन वाढीसाठी २०० एकर क्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित (एआय) प्रकल्प राबविण्यास मान्यता देणात आली. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी ही माहिती दिली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, डॉ. प्रशांत शेटे, डॉ. राहुल घाडगे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत ढगे, सुजित खैरे, प्रकाश पाटे, रुजीत मेहेर, प्रमोद गोखले व पंकज जाधव उपस्थित होते.
यावेळी तंत्रज्ञानाधिष्ठित शेतीकडे वाटचाल करण्यासाठी या प्रकल्पाची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सॅटेलाईट तंत्रज्ञान आणि एआयच्या मदतीने ऊस पिकाचे अचूक व्यवस्थापन, जमिनीचे आरोग्य आणि हवामानाचे निरीक्षण केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन शेती अधिक सक्षम होण्यास मदत होईल असे यावेळी सांगण्यात आले.


















