पुणे : छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन, ११ लाख टन ऊस गाळपाचा निर्धार

पुणे : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या युनिट नंबर-१ च्या ७१ व्या बॉयलर व युनिट नंबर-२ च्या १० व्या अग्निप्रदीपन समारंभ पार पडला. कारखान्याने गेल्या वर्षीच्या गळीत हंगामामध्ये कारखान्याने १०४ दिवसांमध्ये ७,५६,२८५ टन उसाचे गाळप करून ८,५९,००० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. साखरेचा सरासरी साखर उतारा उच्चांकी ११.३६ टक्के इतका मिळाला आहे. चालू वर्षी कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये २३ हजार ६४८ एकर ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. तसेच गेटकेनच्या आठ हजार ६५० एकर उसाचे करार केले असून ११ लाख टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी केले.

संचालक नीलेश टिळेकर, रश्मी टिळेकर व संचालक संतोष मासाळ, वैशाली मासाळ यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. अध्यक्ष जाचक म्हणाले की, वेळप्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्यासाठी मी स्वतःला विकेन, पण कारखाना बंद पडू देणार नाही. चालू गळीत हंगामामध्ये सभासदांनी सर्व ऊस छत्रपती कारखान्यालाच गाळपासाठी द्यावा. वेळेत धन, हजार किलोचाच टन, वजन चोख, पैसे रोख, छत्रपतीलाच ऊस घाला बिनधोख’ अशी आमची भूमिका आहे. सर्व सभासद, गेटकेनधारकांनी ऊस आपल्या कारखान्यालाच देण्याचे आवाहन त्यांनी केले. उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर, कैलास गावडे, अॅड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, सतीश देवकाते आदी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here