पुणे : छत्रपती कारखान्यातर्फे अजितदादा पवार जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह वृक्षारोपणाचा उपक्रम

पुणे : दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्यावतीने रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि अभिवादन अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर आणि बारामती येथील गिरीजा हॉस्पिटलचे डॉ. रमेश भोईटे यांच्या हस्ते झाले. साखर कारखाना आणि गिरीजा ब्लड सेंटरच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती रुग्णालयात हे शिबिर झाले. यावेळी डॉ. भोईटे, अध्यक्ष जाचक, डॉ. योगेश पाटील आणि बाळासाहेब कोळेकर यांनी अजितदादा पवार यांच्या कार्यकर्तृत्वाच्या आठवणींना उजाळा दिला.

कारखान्याच्यावतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षप्रेमी अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण मोहिमेलाही प्रारंभ करण्यात आला. डॉ. योगेश पाटील, संचालक कैलास गावडे, अशोकराव पाटील, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरूटे, मुख्य शेती अधिकारी जालिंदर शिंदे, निखिल रणवरे, अमर जगताप, नंदकुमार चांदगुडे, गजानन कदम, बाळासाहेब कोळेकर, निलेश टिळेकर, सतीश देवकाते, सुचिता सपकळ, हनुमंत घोळवे, सत्यवान चव्हाण, कार्यकारी संचालक अशोक जाधव, जनरल मॅनेजर हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे, डॉ. श्रीकांत ठोंबरे, तांत्रिक सल्लागार महादेव निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here