पुणे : नीरा-भीमा कारखान्याकडून तुकाराम महाराजांच्या रथासाठी पाच लाख रुपयांचा निधी

पुणे: संत तुकाराम महाराज यांच्या ३४१ व्या आषाढी वारीसाठीच्या नवीन हायटेक रथाकरिता नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात हा धनादेश देहू संस्थानकडे सुपूर्त करण्यात आला.

देहू संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे महाराज, विश्वस्त विक्रमसिंह मोरे यांनी हा निधी स्वीकारला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, “देहू संस्थानशी आमचे पिढ्यानपिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. यापूर्वीच्या रथनिर्मितीवेळीही सहकार्य करण्याची संधी मिळाली होती. ७ जुलै रोजी पालखीचे देहूहून प्रस्थान होणार असून, बावडा येथे पालखी आल्यावर परंपरेनुसार विश्वस्तांचा सन्मान केला जाईल.”

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here