पुणे : शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशनतर्फे ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अॅवार्ड’

पुणे : दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ओंकार शुगर ग्रुपला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अॅवॉर्ड’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. असोसिएशनच्या ८४ व्या वार्षिक अधिवेशन व इंटरनॅशनल शुगर एक्स्पो २०२६ अंतर्गत १८ ते २० दरम्यान गोवा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअममध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओंकार शुगर ग्रुपच्या वतीने हा मानाचा पुरस्कार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी स्वीकारला.

ओंकार ग्रुपने साखर उद्योगाच्या विकासात उल्लेखनीय योगदान, व्यावसायिक उत्कृष्टता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी केलेल्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ओंकार शुगर ग्रुपला मिळालेला हा पुरस्कार समूहाच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर झालेली दखल असून, भविष्यात अधिक आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत साखर उद्योग उभारण्याच्या प्रवासाला निश्चितच नवी प्रेरणा देणारा आहे. या सन्मानाबद्दल ओंकार शुगर ग्रुपचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील, संचालक तसेच समूहातील सर्व अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी आणि हितचिंतकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या पुरस्कारामध्ये साखर उद्योगाच्या विकासातील व्यावसायिक उत्कृष्टता व उल्लेखनीय योगदानाची विशेष दखल घेण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here