पुणे : शिरुर तालुक्यात बिबट्याचा वावर, वनविभागाकडून जनजागृतीसह परिसरात गस्त

पुणे : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, टाकळी भीमा व विठ्ठलवाडी परिसरात सध्या ऊसतोडणी सुरू आहे. हे क्षेत्र बिबट प्रवण असल्याने वनविभागातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. परिसरात रात्रीची गस्त घातली जात असून ऊसतोड मजूर, त्यांची मुले व ग्रामस्थांना संरक्षणात्मक उपाययोजनांची माहिती दिली जात आहे. बिबट्याचे दर्शन होत असल्याने वनविभागाने रात्रीची गस्त सुरू केली आहे. ऊसतोड कामगार आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी केले आहे.

वन विभागाने शेतकरी तसेच ऊस तोडणी कामगारांसाठी माार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शेतात काम करताना मुलांवर लक्ष ठेवावे, वास्तव्य ठिकाणी उजेड ठेवावा, गोठा बंदिस्त ठेवावा आणि बिबट्या दिसल्यास तातडीने कळवावे असे सांगण्यात आले आहे. वनपरिमंडळ अधिकारी रूपावली जगताप, नियतक्षेत्र वनाधिकारी सोपान अनासुने, पूनम जाधव तसेच वन्यजीव बचाव पथकाचे शेरखान शेख, अमोल कुसाळकर, राहुल गायकवाड, रोहिदास शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती तसेच गस्तीचा उपक्रम सुरू आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here