पुणे : उचल घेऊन ऊस तोडणी कामगार पळून गेल्याने एकाचे अपहरण करून डांबले, संशयितास अटक

पुणे: उसतोडणीची उचल म्हणून सहा लाख रुपये घेऊन कामगार पळून गेल्याच्या रागातून एकाचे अपहरण करून डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथे एकाला डांबून ठेवण्यात आले होते. पैशांच्या वसुलीसाठी झालेल्या या अपहरण प्रकरणात दत्तात्राय कोळेकर (वय ४०, रा. अनगर ता. मोहोळ, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी देवानंद कैलास आडे (वय २५, रा. पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना (दि.९) एप्रिल रोजी मान येथे घडली. कोळेकर यांना उसतोडीची लाखो रुपयांची उचल घेऊन मजूर पुरविले होते. मात्र, ते कामगार तीन – चार दिवस काम करून पळून गेले. या रागातून हा प्रकार घडला.

फिर्यादी देवानंद आडे यांच्या भावाला मालकाने पैसे वसूल करण्यासाठी तब्बल दोन महिने डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शनिवारी (दि.१३) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. त्यांना सोलापूर येथे अनगर येथे एका खोलीत डांबून ठेवले. वेळोवेळी मारहाण केली. फिर्यादी यांनी भावाला सोडण्यास सांगितले असता उचल म्हणून घेतलेले सहा लाख रुपये द्या आणि तुमच्या भावाला घेऊन जा असे सांगितले. पोलिसांनी सोलापूर येथून फिर्यादी यांच्या भावाची सुटका केली. तसेच आरोपी कोळेकर याला अटक केली असून हिंजवडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कांदे अधिक तपास करत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here