पुणे : निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे आता हरित ऊर्जेकडे पाऊल; सीबीजी प्रकल्प उभारण्याचे नियोजन

पुणे : शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याने कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प (सीबीजी) उभारणीचे नियोजन सुरू केले आहे. कारखान्याचे संस्थापक तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्यासह संचालक मंडळाने खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे उभारण्यात आलेल्या राज प्रोसेसच्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांटला भेट देत पाहणी केली. राज प्रोसेसचे मालक अनिलराज पिसे यांनी हर्षवर्धन पाटील व भाग्यश्री पाटील यांचे स्वागत करून प्लांटच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.

यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी सांगितले की, साखर उद्योग हा केवळ साखर उत्पादनापुरता मर्यादित राहिलेला नसून आता ऊर्जा क्षेत्रामध्येही मोठ्या संधी निर्माण होत आहेत. शाश्वत आणि हरित ऊर्जे च्या दिशेने उद्योगांची वाटचाल सुरू असून कॉम्प्रेस्ड बायोगॅस हे देशातील अत्यंत आश्वासक क्षेत्र बनत आहे. तर हर्षवर्धन पाटील म्हणाले, निरा भीमा कारखान्याने स्थापनेपासूनच काळाची गरज ओळखून नवनवीन प्रकल्प यशस्वीपणे राबविले आहेत. आता कारखान्याच्या माध्यमातून कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. भविष्यात सीबीजी हे पर्यावरणपूरक आणि शाश्वत पर्यायी इंधन ठरणार आहे. यावेळी लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, दत्तात्रय पोळ, निवृत्ती शिंदे, कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here