पुणे : सोमेश्वर साखर कारखान्याच्या ‘कोपीवरची शाळा’ उपक्रमाची सांगता, विद्यार्थ्यांचा केला गौरव

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा हा उपक्रम राबविला जातो. यंदाच्या हंगामात यामध्ये ४८६ मुलांची नोंद झाली होती. त्यापैकी ६ ते १४ वयोगटातील २३८ मुलांची शैक्षणिक क्षमता तपासण्यात आली. हंगामाअखेर झालेल्या चाचणीत १८२ मुलांच्या शैक्षणिक स्तरात सुधारणा झाल्याचे दिसून आले. या उपक्रमाची नुकतीच सांगता झाली. यावेळी १८२ मुलांनी शैक्षणिक प्रगती साधल्याबद्दल त्यांना संचालक मंडळाच्या हस्ते प्रगतिपुस्तके देऊन गौरविण्यात आले.

कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, संचालक सुनील भगत व कार्यकारी संचालक सुनील भगत यांच्या उपस्थितीत या यशस्वी मुलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभिजित काकडे, किसन तांबे, ऋषिकेश गायकवाड, अनंत तांबे, प्रदीप काकडे उपस्थित होते. मुलांनी साखर निर्मितीचे तंत्र प्रत्यक्ष अनुभवले. उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी मुलांना कारखान्यातील गव्हाणीपासून ते साखर गोदामापर्यंतची सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. मुलांनी करंजेपूल येथील समर्थ कॉम्प्युटर सेंटरमध्ये संगणक हाताळण्याचा आनंद घेतला. ‘रागणी फाउंडेशन’तर्फे ऊसतोड मजूर महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले, तर वाणेवाडीच्या ‘साद संवाद’ ग्रुपने कपड्यांचे वाटप करून मजुरांना निरोप दिला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here