पुणे : घोडगंगा साखर कारखान्याच्या संचालक मंडळाला राज्य सरकारची दुसऱ्यांदा नोटीस

पुणे : घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (१९ सप्टेंबर) रोजी होणार आहे. गेल्या तीन हंगामांपासून कारखाना बंद आहे. कारखाना सुरू करण्यासाठी राजकारण न करता, एकमेकांना दोष न देता सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. माजी संचालक सुधीर फराटे आणि सहकार क्षेत्रातील नेते काकासाहेब खळदकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत कारखान्यावर प्रशासक नेमण्याबाबत राज्य सरकारने संचालक मंडळाला दुसऱ्यांना नोटीस बजावली आहे अशी माहिती दिली. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) कर्जप्रस्ताव नाकारल्याने कारखान्याची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेने होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

माजी उपाध्यक्ष पाटील-फराटे, काकासाहेब खळदकर म्हणाले की, ‘एनसीडीसी’ने कर्ज प्रस्ताव नाकारला आहे. त्यामुळे कारखान्याचे भवितव्य धोक्यात आले आहे. कारखान्याचे भागभांडवल कमी आहे. संचालक मंडळाकडून ठोस आश्वासन देण्यात आले नसल्याने कर्जप्रस्ताव नाकारला गेला. कारखाना पूर्ववत सुरू करण्यासाठी भागभांडवल उभारणे आवश्यक आहे. याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि आमदार माऊली कटके यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक झाली. मात्र, अपूर्ण माहिती आणि शासनाला अपेक्षित अहवाल सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे संचालक मंडळाला दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे. कारखाना सुरू करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी आवाहन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here