पुणे : विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची १९ ऑगस्टला वार्षिक सभा, सभासदांना ‘केवायसी’ करण्याचे आवाहन

पुणे : जुन्नर-आंबेगाव येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची सन २०२५-२६ या वर्षाची अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता निवृत्तीनगर-धालेवाडी येथे कारखाना कार्यस्थळावर होणार आहे. कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल. सभेत दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाबाबत संचालक मंडळाने सादर केलेल्या अहवालाची नोंद घेणे आणि सन २०२५-२६ अखेर मंजूर केलेल्या जमा-खर्चपत्रकाची नोंद घेणे, या विषयांचा समावेश आहे. तसेच सभासदांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत कारखाना प्रशासनाने सांगितले की, सभेस उपस्थित राहताना सभासदांनी स्मार्ट शेतकरी कार्ड सोबत आणावे. तसेच, ज्या सभासदांची केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी आधारकार्ड सोबत आणून सभेच्या वेळी केवायसी करून घ्यावी. सभेत वैधानिक लेखापरीक्षकांकडून सन २०२५-२६ चा लेखापरीक्षण अहवाल वाचून त्याची नोंद घेणे, सन २०२६-२७ साठी संचालक मंडळाने सादर केलेल्या महसुली व भांडवली अंदाजपत्रकास मंजुरी देणे, अंतर्गत लेखापरीक्षकांची नियुक्ती याबाबत विचार केला जाणार आहे. कारखान्यात २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी तज्ज्ञ सल्लागारांची नियुक्ती, अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे आणि मागील वर्षातील लेखापरीक्षण दोषदुरुस्ती अहवालास मंजुरी देणे, या विषयांवरही चर्चा होणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here