विश्वास साखर कारखान्यात उद्या रोलर पूजन समारंभ

सांगली : चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे. या अंतर्गत गुरुवारी (दि. १३) गळीत हंगाम २०२४-२५ साठी रोलर पूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कारखान्याचे संचालक डॉ. राजाराम पाटील यांच्या हस्ते  सकाळी ९.४५ वाजता रोलर पूजन होईल. कारखान्याचे कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी सांगितले की, रोलर पूजन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक अमोल पाटील अध्यक्षतेखाली तर उपाध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब यांच्या पाटील-सरुडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. यावेळी सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here