सांगली : हुतात्मा कारखान्यावर ३८६ कोटींचे कर्ज चिंताजनक बाब; पारदर्शक कारभाराची गरज

सांगली: हुतात्मा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्याविरोधातील आंदोलन हा नायकवडी कुटुंबातील वाद वाटत असला, तरी कारखान्यावर ३८६ कोटींचे कर्ज झाले कसे? हा प्रश्न समोर आला आहे. गेली वर्षभर अण्णांचे नातू केदार नायकवडी वार्षिक सभेत व पत्रकार परिषदांमधून आरोपांच्या फैरी झाडत आहेत. गेल्या वर्षांच कारखान्याने १४८ कोटींचे कर्ज घेतले आहे आणि आतापर्यंत ३८६ कोटीचा कर्जाचा डोंगर झाला आहे असे गंभीर आरोप केदार नायकवडी यांनी केले आहेत. त्याचा खुलासा होण्याची गरज आहे. तसेच कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी स्वतःच संचालक असलेल्या अॅग्री नित्यम कंपनीची आठ वर्षांत ७९५ कोटींची उलाढाल झाली कशी, हा प्रश्नही विचारला जात आहे.

वैभव नायकवडी संचालक असलेल्या अॅग्री नित्यम कंपनीने हुतात्मा बझारद्वारा ११ लाख क्विंटल, तसेच भेटही साखर खरेदी केली आहे. कर्नाटकातील कोगनोळी येथील दत्तगुरू पतसंस्थेत ठेवलेले वीस कोटी पुपये, हुतात्मा बझारने अॅग्री नित्यम कंपनीला दिलेले ९२ कोटी, वेगवेगळ्या संस्था, कंपन्यांशी झालेले व्यवहार, अनामत ठेवी स्वरुपात ठेवलेल्या रकमा, अॅग्री नित्यम कंपनीचे विविध व्यवहार आंदोलकांनी चर्चेत आणले आहेत. केदार नायकवडी यांनी ३ डिसेंबर २०२५ ला कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे गोदामातील विनानोंद ४० हजार क्विंटल साखरेबाबत तक्रार केली. हुतात्मा बझारच्या व्यवहाराबाबतही तक्रार झाली. त्यावर २३ डिसेंबर २०२५ रोजी साखर सील करण्यात आली. यावर १४ मे रोजी कोल्हापुरात, हुतात्मा बझार संबंधातील तक्रारीवर ४ मे रोजी ईश्वरपुरात सहाय्यक निबंधकांसमोर सुनावणी होणार आहे. मात्र, सभासदांसमोर खुलासा होण्याची गरज आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here