सांगली : दालमिया शुगरकडे ८ हजार हेक्टरमधील उसाची नोंद, ५ लाख टन गाळप करणार

सांगली : करूंगली-आरळा (ता. शिराळा) येथील दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड युनिट निनाईदेवी साखर कारखान्याने मागील २०२५-२६ च्या हंगामातील ११० दिवसांत ४ लाख ४२ हजार २१९ टन उसाचे गाळप केले. या हंगामात साखर उतारा १२.०२५ टक्के नोंदविण्यात आला. चालू हंगामात २० ऑक्टोबरपासून गाळप सुरू झाले असून, १२३ दिवसांच्या हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा १२.२५ टक्के साखर उताऱ्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चालू हंगामासाठी सुमारे ८ हजार ३३ हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. कारखान्याने ५ लाख १० हजार ७५४ टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

दालमिया शुगरने जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस दर देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोडणी कामगार, वाहतूकदार आणि सर्व संबंधित घटकांच्या सहकार्याने गाळप हंगाम २०२६-२७ यशस्वी करण्याचा कारखान्याचा संकल्प आहे. शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने रास्त व किफायतशीर दर देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. दर निश्चित करताना लागू निकष आणि साखर उताऱ्याचा विचार केला जाणार आहे. दराबरोबरच सुधारित ऊस जाती, ठिबक सिंचन, पाचट व्यवस्थापन आणि शास्त्रीय खोडवा व्यवस्थापनासाठीही कारखान्याकडून प्रोत्साहन दिले जात आहे, असे दालमिया शुगरचे युनिट हेड श्रीधर गोसावी यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here