सांगली : हुतात्मा कारखान्याच्या गोदामातील अतिरिक्त साखरेवरून गौरव नायकवडींची टीका

सांगली : गेल्या १५ दिवसांपासून हुतात्मा साखर कारखान्यासमोर अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी कारखान्यावरील कर्ज भागवून राजीनामा द्यावा यासाठी सभासद, शेतकरी यांनी किरण नायकवडी, गौरव आणि केदार नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. जर तुमचा कारभार पारदर्शक असेल तर सरकारने हुतात्मा साखर कारखान्यावर छापा मारून साखर गोडावून का सील केले? इतर गोडवूनमध्ये अतिरिक्त साखर कोठून आली? गेली २० वर्षे असा गैरकारभार राजरोसपणे सुरू आहे, याचे उत्तर वैभवकाका यांनी सभासद, शेतकऱ्यांना द्यावे, असे आवाहन गौरव नायकवडी यांनी आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत केले.

गौरव नायकवडी म्हणाले, गेली अनेक वर्षे साखर कारखान्यात भ्रष्टाचार सुरू आहे. माझ्यावर कोणताही आरोप नसताना मी राजीनामा द्यायला तयार आहे, मग इतके आरोप असतानाही वैभवकाका का राजीनामा द्यायला तयार नाहीत, असा त्यांनी सवाल केला. दूध संघ अडचणीत आणण्यात वैभव नायकवडी यांच्या मेहुण्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांचा गैरकारभार लवकरच आम्ही बाहेर काढणार आहोत असे त्यांनी सांगितले. किरण नायकवडी यांनी शेतकरी, सभासदांच्या सहनशीलतेचा आंत पाहू नका. आम्हाला हा संघर्ष वाढवायचा नाही. अडचणीत आणलेला साखर कारखाना सावरायचा आहे असे सांगितले. तर चर्चेमधून प्रश्न सुटणार आहेत, तरीसुद्धा काही गोष्टींचा खुलासा करावाच लागेल, असे सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel

….त्यांनी हुतात्मा साखर कारखाना चालवण्याची स्वप्ने पाहू नयेत : वैभव नायकवडी

या आरोपांना वैभव नायकवडी यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांना हुतात्मा दूध संघ चार वर्षे चालवता आला नाही, त्यांनी हुतात्मा साखर कारखाना चालवण्याची स्वप्ने पाहू नयेत. हुतात्मा बझारचे ९१ लाख रुपयांचे देणे आधी भागवावे आणि मगच बेछूट आरोप करावेत. साऱ्याच गोष्टी उघड करायला भाग पाडू नका, असा इशारा वैभव नायकवडी यांनी वाळवा येथे आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत केला.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here