सांगली : शिक्षण संस्थेला भाडेपट्टीने दिलेली जमीन परत घेण्याचा हुतात्मा कारखान्याच्या सभेत ठराव

सांगली : हुतात्मा कारखान्याची सन २०२५ २६ आर्थिक वर्षाची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या अध्यक्षा जयश्री अहिर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेमध्ये विषय पत्रिकेवरील व ऐनवेळीचे सर्व विषय एकमताने मंजूर करणेत आले. आगामी हंगाम पूर्ण क्षमतेने चालू करणार असल्याचा ग्वाही जयश्री अहिर यांनी दिली. सभेत कारखान्याने किसान शिक्षण संस्थेला भाडेपट्ट्याने दिलेली जमीन परत कारखान्याला घेण्याचा ठराव सभेत करण्यात आला. सभेमध्ये साखर गोडावूनमधील सिल केलेली साखर सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विक्री करणेस मंजुरी देणेत आली. याशिवाय क्रांतिवीर नागनाथअण्णांचा पुतळा, स्मारक लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे सांगण्यात आले.

कारखान्याला एनसीडीसीने मंजूर केलेले कर्ज मिळू नये यासाठी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेले रिटपिटीशन माघारी घेत असल्याचे जाहीर केलेबद्दल तक्रारदार चंद्रशेखर शेळके व इतर तक्रारदार यांचे अभिनंदन ठराव घेण्यात आला. कारखान्याचे संचालक गौरव नायकवडी यांनी कारखान्याने गेल्या चार महिन्यांत २१ कोटींचे कर्ज फेडल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, बँकामध्ये कारखान्याची पत सुधारली आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील युवकांना नोकरीची संधी दिली जात आहे.’ यावेळी केदार नायकवडी यांनी कारखान्याच्या नियोजित सी. बी. जी. प्रकल्पाची व गेल्या चार महिन्यांत केलेल्या कामांची माहिती दिली. माजी अध्यक्ष वैभव नायकवडी यांनीही सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. कार्यकारी संचालक शिवाजी पाटील विषय पत्रिकेनुसार विषयांचे वाचन केले. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी आभार मानले. यावेळी हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष, सभासद, शेतकरी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here