सांगली : क्रांती साखर कारखान्याचे सामाजिक भान, वारकऱ्यांना दिंडीसाठी पाणी टँकरची सुविधा

सांगली : दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत अत्यंत श्रद्धा, निष्ठा आणि भक्तिभावाने पंढरपूर वारीचा पायी प्रवास पूर्ण करतात. अशा या पवित्र वारीत वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, ही केवळ सेवा नसून सामाजिक बांधिलकी आणि संत-वारकरी परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी केले. श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या दिंडी क्र.१ व ७ मधील वारकऱ्यांसाठी कारखान्याच्यावतीने यंदाही पिण्याच्या शुद्ध पाण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. यासाठी सज्ज टँकरचे पूजनप्रसंगी लाड बोलत होते.

यावेळी अध्यक्ष लाड म्हणाले की, “संतपरंपरेचा तेजस्वी वारसा लाभलेली आळंदी ते पंढरपूर पायी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. श्री विठ्ठल आणि संतपरंपरेप्रती श्रद्धा व्यक्त करत समाजसेवेचा हा उपक्रम पुढील काळातही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वारकऱ्यांच्या सेवेला सर्वोच्च स्थान देत ‘क्रांती’ परिवाराने अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे जपली आहे. यंदाही वारकऱ्यांना गैरसोय होऊ नये, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे असे ते म्हणाले. याावेळी परिसरातील वारकरी, कारखान्याचे संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here