सांगली : डफळे कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेच्या चौकशीची आमदार गोपीचंद पडळकरांची विधानसभेत मागणी

सांगली : दुष्काळग्रस्त जत, कवठेमहांकाळ, सांगोला आणि मंगळवेढा परिसरातील २२ हजार सभासदांनी दागिने गहाण ठेवून, जनावरे विकून आणि शेअर्स भरून डफळे सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली गेली. मात्र या कारखान्याची कवडीमोल दरात विक्री झाली आहे. त्याच्या लिलाव प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व कागदपत्रे सभागृहासमोर ठेवावीत, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेत केली. अधिवेशनात आठवडा स्थगन प्रस्तावावरील चर्चेत त्यांनी कारखान्याच्या विक्री प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. हा २५० एकरांवर उभारलेला कारखाना पुन्हा २२ हजार सभासदांच्या मालकीचा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

आमदार पडळकर यांनी काारखान्याच्या विक्री प्रक्रियेबाबतची कादगपत्रे राज्य सहकारी बँक, सहकार आयुक्त कार्यालय आणि संबंधित यंत्रणांकडे मागूनही ती उपलब्ध होत नसल्याचा दावा केला. सहकारी साखर कारखान्यांच्या विक्री प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करून शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने पुन्हा शेतकऱ्यांकडे द्यावेत, असेही ते म्हणाले. सरकारने लिलाव प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेसाठी मंजूर निधीबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले. जत-उमदी रस्ता, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत, प्राणीसंग्रहालय, महाज्योती व वनार्टी योजना, संत बसवेश्वर स्मारक आणि पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंकला ‘वीर शिंग्रोबा’ यांचे नाव देण्याची मागणीही सभागृहात केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here