सांगली : आरपीएल क्रिकेट स्पर्धेत राजारामबापू साखर कारखाना संचालक संघ विजयी

सांगली : येथे सुरू असलेल्या राजारामबापू प्रीमिअर लीग (आरपीएल) क्रिकेट क्रिकेट स्पर्धेत राजारामबापू साखर कारखाना संचालक विरुध्द राजाराबापू सहकारी दूध संघ संचालक संघात सामना झाला. या स्पर्धेत राजारामबापू शिक्षण आणि उद्योग समूहातील विविध संस्थांचे २० संघ सहभागी झाले आहेत. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील या दोघा बंधूंनी चौकार व षटकारांची आतषबाजी करत संचालक संघाला मोठा विजय मिळवून दिला. या स्पर्धेत प्रतीक पाटील सामनावीर ठरले. त्यांनी ९ चौकार आणि ७ षटकारांसह ८८ धावा ठोकल्या. तर देवराज पाटील यांनी ६ चौकार व एका षटकारांसह ३९ धावा ठोकल्या. त्यांचा विनायक पाटील, विजयराव पाटील, बाळासाहेब पवार, बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

स्पर्धेत प्रतीक पाटील व देवराज पाटील या बंधूंनी राजारामबापू साखर कारखाना संचालक संघाच्या फलंदाजीची सुरुवात केली. पाटील बंधूंनी चौकार आणि षटकारांची आतषबाजीच सुरू केली. या संघाने १० षटकांत २ बाद १७८ धावा केल्या. राजारामबापू दूध संघ संचालक संघाच्या सुधीर पाटील, संजय शिंदे, धैर्यशील पाटील, प्रशांत थोरात, अल्लाउद्दीन चौगुले, धैर्यशील थोरात यांची झुंज व्यर्थ ठरली. हा संघ ९८ धावांनी पराभूत झाला. तर राजारामबापू कारखाना सुरक्षा रक्षक संघ विरुध्द राजारामबापू कारखाना सुपरवायझर संघातील सामना सुरक्षा रक्षक संघाच्या नितीन मंडलेने गाजवला. त्याने नाबाद ११४ धावांचे योगदान देत प्रतिस्पर्धी संघाचे ५ गडी बाद केले. हा सामना सुरक्षा रक्षक संघाने चांगल्या फरकाने जिंकला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here