सांगली : शेतकऱ्यांना दिलासा, हुतात्मा कारखान्याकडून ठेवींवरील १.५२ कोटींचे व्याज जमा

सांगली : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने शेतकरी ठेवींवरील व्याजापोटी १ कोटी ५२ लाख ४० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याच्या अध्यक्षा जयश्री अहिर व संचालक गौरव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांना देय असणारी रक्कम वेळेत देण्याची कारखान्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कारखान्याचे उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, संचालक केदार नायकवडी, सचिव मुकेश पवार आदी उपस्थित होते.

अध्यक्षा जयश्री अहिर यांनी सांगितले की, यंदा पार पडलेल्या गळीत हंगामात कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १६६ कोटी रुपयांची ऊसबिले तसेच तोडणी व वाहतूक खर्चाची रक्कम अदा केली आहे. कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाची तयारी सध्या वेगाने सुरू असून, ऊस तोडणीचे करारही पूर्ण झाले आहेत. शेतकरी ठेवींवरील व्याजाची रक्कम वेळेत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पेरणी, बियाणे खरेदी, खते व शेतीच्या अन्य खर्चासाठी मोठा आर्थिक दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here