सातारा : ‘जयवंत शुगर्स’ची आगामी गळीत हंगामाची तयारी, कारखान्यात मिल रोलरचे पूजन

सातारा: आगामी गळीत हंगामासाठी बहुतांश साखर कारखान्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. धावरवाडी (ता. कऱ्हाड) येथील जयवंत शुगर्स कारखान्यात येत्या गळीत हंगामासाठी विनायक भोसले यांच्या हस्ते मिल रोलरचे पूजन करण्यात आले. या वेळी जयवंत शुगर्सचे अध्यक्ष सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर, सरव्यवस्थापक (तांत्रिक) ए. बी. खटके आदी उपस्थित होते. आगामी गळीत हंगामात अडचणी येऊ नयेत यासाठी कारखान्यात देखभाल, दुरुस्तीच्या कामालाही वेग देण्यात आला आहे.

कारखाना कार्यस्थळावर झालेल्या धार्मिक विधीनंतर विनायक भोसले यांच्या हस्ते यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ झाला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे दादासाहेब मोहिते, वसंतराव पवार, आनंदा पाटील, एम. के. कापूरकर, नाना शेळके, वर्क्स मॅनेजर एच. एम. नदाफ, प्रॉडक्शन मॅनेजर बी. जी. चव्हाणके, केन मॅनेजर नाथाजी कदम, मुख्य प्रशासकीय अधिकारी आर. टी. शिरसाट, व्ही. जी. म्हसवडे, पी. एस. जाधव, ए. एल. काशीद, जी. एस. बाशिंगे, व्ही. पी. जोशी, दिलीप पेन्टेवार, सुरक्षा अधिकारी व्ही. टी. भोसले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here