सातारा : कृ्ष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी पाळला शब्द, कामगारांना पगारवाढ लागू

सातारा : कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना उच्चांकी दर देतानाच कामगारांना किमान वेतन दहा हजारांच्या पुढे देण्याचा निर्णय घेतला होता. या भूमिकेची अंमलबजावणी करत गेल्या पाच वर्षांत किमान तीन वेळा पगारवाढ देत त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. यापूर्वी अनेक कामगार रोजंदारीवर कार्यरत होते. डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांची मस्टरवर नोंद करून अधिकृत कामगार म्हणून मान्यता दिली. विशेषतः बेसिक वेतन दहा हजारांच्या वर असावे, या ठाम भूमिकेमुळे कामगारांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. कामगारांना यापुढेही पगारवाढ दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी रोलर पूजन प्रसंगी दिल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

कृ्ष्णा कारखान्यात अनेकदा सत्तांतर झाले होते. सत्तांतरानंतर प्रत्येक वेळी कामगार भरती झाली. मात्र नुसते काम देऊन अथवा कामावर घेऊन उपयोग नाही, तर कामगारांना चांगला पगार व सुविधा मिळाव्यात ही डॉ. सुरेश भोसले यांची आग्रही भूमिका राहिली आहे. कारखान्यात सध्या सुमारे १५०० ते १६०० कामगार कार्यरत आहेत. त्यातील ३०१ कामगार कायमस्वरूपी आहेत. कामगारांना जास्तीत जास्त दिवस रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरणही राबवले जात आहे. व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनीही कामगारांना न्याय मिळावा, अशी आग्रही भूमिका मांडली होती.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here