सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातर्फे १०० टक्के एफआरपी अदा

सातारा : पाटण तालुक्यातील मरळी-दौलतनगर येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने यंदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर शंभर टक्के एफआरपीची रक्कम जमा करून, कारखान्याने ठळक कामगिरी केली आहे. चेअरमन यशराज देसाई यांच्या नियोजनबद्ध, अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्वाखाली कारखान्याने शेतकऱ्यांना तीन हजार रुपयांची पहिली उचल दिली. प्रतिकूल परिस्थितीतही यशराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली कारखाना व्यवस्थापनाने दिलेला शब्द पाळला. कारखान्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर यशराज देसाई यांनी कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता १२५० वरून २५०० मेट्रिक टनांपर्यंत वाढवली. पुढील टप्यात ही क्षमता तीन हजार मेट्रिक टन करण्याचे नियोजन आहे.

या साखर कारखान्याची प्रतिदिन २५०० मेट्रिक टन एवढी मर्यादित गाळप क्षमता आहे. डोंगराळ परिस्थिती आणि संसाधनांची कमतरता या अडचणींवर मात करत, कारखान्याने कोणतेही कर्ज न घेता १०० टक्के एफआरपी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली. कारखान्याला पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शन लाभत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा जपत, सहकार क्षेत्रात नवे मानदंड प्रस्थापित करण्याचा निर्धार यशराज देसाई यांनी व्यक्त केला. कारखान्याने दिलेल्या १०० टक्के ऊस बिलातून कारखान्याची आर्थिक शिस्त आणि पारदर्शक कारभार अधोरेखित आला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here